शिरूर तालुका

फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!

पुणे: यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. २०) फुलगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत वाघोली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोमखेल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यांत द्वितीय क्रमांक पटकावला.

या यशामागे हवेली तालुक्याचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी श्री. मुंडे, केंद्रप्रमुख श्रीमती प्रज्ञा बांदल आणि केंद्रसमन्वयक शंकर महाराज बडे यांच्या प्रोत्साहनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. स्पर्धक विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षिका श्रीमती सारीका काळपूंड यांनी कठोर परिश्रम घेतले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता कालप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत सातव पाटील, सर्व शिक्षक वृंद आणि व्यवस्थापनानेही स्पर्धकांना मोलाची साथ दिली.

शाळेच्या इतिहासात प्रथमच कला-क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर पोहोचत डोमखेल शाळेने नवे यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल ग्रामस्थ व पालकांमध्ये विशेष आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत असून विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डोमखेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार…

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

8 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

10 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

11 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

11 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago