domkhel-school

डोमखेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार…

शिरूर तालुका

वाघोली (पुणे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी) येथे विद्यार्थ्यांचा गणितीय संकल्पनांवर प्रभुत्व वाढावे, व्यवहारज्ञान अधिक सुलभ व्हावे तसेच ‘शिकताना करणे’ या पद्धतीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने आठवडी बाजार हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमास सर्वच शालेय विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल येथे शनिवारी (ता. १०) पार पडलेल्या या उपक्रमाला शालेय विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विक्रेते व ग्राहक बनून स्वतः व्यवहार करत गणना, अंदाज, देवाण-घेवाण आणि संवाद यांचे प्रत्यक्ष धडे घेतले. या उपक्रमामागील प्रेरणादायी भूमिका शाळेचे आधारस्तंभ, ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे चेअरमन व आव्हाळवाडी ग्रामपंचायत समितीचे सदस्य काकासाहेब रामराव सातव पाटील, माजी सरपंच रामचंद्र आबा सातव पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत अशोकराव सातव पाटील यांची होती.

कार्यक्रम प्रसंगी चेअरमन प्रकाश सातव पाटील, उद्योजक प्रतिक आव्हाळे पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत सातव पाटील, उद्योजक दशरथ सातव पाटील, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शरदभाऊ सातव पाटील, मा. ग्रामपंचायत सदस्य मयूरशेट सातव पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक आप्पा सातव पाटील, विकासशेट सातव पाटील, नारायणशेट सातव पाटील, उद्योजक संभाजी सातव पाटील व सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र नाना सातव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका वनिता कालप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात शिक्षक लक्ष्मण साकोरे, अपर्णा थोरात, बाळासाहेब टेमगिरे, जांभळे मॅडम, काळपूंड मॅडम, उमेश थोरात, वर्षा थोरात यांचे विशेष योगदान होते. शिक्षकांनी सांगितले की, ‘अभ्यासातील गणित, व्यवहारातील गणित, वयाच्या लहान वयातच मुलांकडून करून घेण्याचा हा उत्तम प्रयोग असून मुलांची आत्मविश्वास व संवादकौशल्यातही वाढ होत आहे.’

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…