शिरूर तालुका

सौर पंप एजन्सींकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक!

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना वीजटंचाईवर उपाय म्हणून कमी खर्चात सौर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी प्रत्यक्षात या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा भ्रष्टाचार आणि पिळवणुकीचे प्रकार शिरूर तालुक्यात समोर येत आहेत. योजना लाभार्थ्यांसाठी असली तरी, ती काही ठराविक एजन्सी आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या एजंटांच्या फायद्याची ‘संधी’ ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

योजनेनुसार शेतकऱ्यांनी फक्त ५ टक्के रक्कम भरायची असून उर्वरित ९५ टक्के रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी वेगवेगळ्या बहाण्यांनी अतिरिक्त खर्च आकारले जात आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

सौर साहित्य स्वतःच्या वाहनातून घेऊन जायला लावणे,खड्डे खोदणे, सिमेंट, वाळू, खडी स्वतः खरेदी करायला भाग पाडणे,पंप बसवण्यासाठी एक ते दोन हजार रुपये ‘अधिक’ घेणे,सौर पंप बिघडल्यास देखभाल-दुरुस्तीसाठी कोणतीही मदत न देणे,गॅरंटी कार्ड न देणे किंवा खराब साहित्य बसवणे यामुळे शेतकरी बेजार झाले असून अशा बोगस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे

महादू मुसळे, म्हसे येथील जेष्ठ नागरिक, सांगतात, मी पैसे भरले असूनही साहित्य स्वतः फाकटेहून आणायला सांगण्यात आले. काम सुरू करायलाही कोणी येत नाही. महिनाभर झाला तरी अजून सौर पंप कार्यान्वित झाला नाही.

मनिषा बारहाते, टाकळी हाजी येथील शेतकरी महिला म्हणतात की, रोटोमॅग कंपनीने सौर प्लेट खराब दिली. सहा महिने झाले तरी बदल दिला नाही. फोन घेत नाहीत. गॅरंटी कार्डही नाही. आमची सरळ फसवणूक चालू आहे.

राजेंद्र गावडे, माजी संचालक, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, यांनी तीव्र शब्दांत याबाबत संताप व्यक्त केला आहे .एजन्सी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. ही कामे त्यांची जबाबदारी असूनही ती शेतकऱ्यांकडून करून घेत आहेत. यांच्यावर कारवाई करून थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे.” अशी मागणी त्यांनी केली आहे

याबाबत शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी स्पष्ट केले की, सौर पंप मंजूर झाल्यानंतर साहित्य वाहतूक, खड्डे खोदणे, सिमेंट इत्यादी जबाबदारी एजन्सीचीच आहे. शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ते चुकीचे असून, काही एजन्सीविरोधात तक्रारी आल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे आरोप असेही आहेत की, महावितरणमधील काही अधिकारी या एजन्सींच्या बिले परस्पर पास करून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना न्यायासाठी कुठेही दाद मागता येत नाही, ही खेदजनक स्थिती निर्माण झाली आहे.या योजनेचे नियंत्रण MEDA व MSEDCLकडे असूनही एजन्सींच्या बेकायदेशीर वर्तनावर अंकुश नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. शासनाने यावर त्वरित दखल घेऊन दोषी एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे व आर्थिक दंड ठोठावणे अत्यावश्यक आहे.

हे प्रकरण केवळ एका गावापुरते मर्यादित नाही. हे संपूर्ण राज्यभरातील योजना अंमलबजावणीतील एक नमुना आहे. शासनाने जर वेळेत कारवाई केली नाही, तर शेतकरी संघटना आणि सामान्य शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडू शकतात.

तुमचाही अनुभव असाच असेल तर गप्प बसू नका!

महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा आणि लेखी तक्रार नोंदवा. तुमच्या आवाजामुळे आणखी एखाद्या शेतकऱ्याची फसवणूक टळू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago