क्राईम

इचकेवाडीत जमीन वादातून हाणामारी; सहा जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई (इचकेवाडी) येथे जमीन वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात गु.र.नं. 260/2025 अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना 18 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष बाळकृष्ण इचके (वय 40, रा. कवठे येमाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या गट क्र. 104 या जमिनीच्या शेजारी आरोपी कांद्याची आरण (चाळ) बांधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा संतोष इचके व त्यांचे कुटुंबीय – भाऊ राजेंद्र, भावजय सुरेखा, आई मंगल आणि पत्नी रूपाली – यांनी बांधकाम थांबवण्यास सांगितले असता, आरोपींनी चिडून जाऊन मारहाण केली, शिवीगाळ केली व दमदाटी केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपींविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टाकळी हाजी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार वारे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago