शिरूर तालुका

पुणे न्यायालयात वकीलांसाठी प्रथमच स्वतंत्र रुग्णवाहिका

अ‍ॅड. राजेंद्र उमापांकडून पुणे बार असोसिएशनकडे रुग्णवाहिका सुपूर्द

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यात संख्येने १५ हजारांपेक्षा जास्त असलेल्या पुणे न्यायालयातील सर्व वकीलांसाठी आणि सुमारे ५०० न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांच्याकडून नुकतीच सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली असून न्यायालयात वैद्यकीय आपत्कालीन सुविधा नसलेल्या पुण्यातील वकीलांसाठी सदर रुग्णवाहिका नुकतीच अ‍ॅड राजेंद्र .उमाप यांचे वडील बाबुराव उमाप यांचे हस्ते पुणे बार असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

पुणे येथे महाराष्ट्र व गोवा वकील परिषद तसेच पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने‌ एक दिवसाची पश्चिम महाराष्ट्रातील प्रादेशिक वकील परिषद व कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्र वकील परिषदेचे राष्ट्रीय सदस्य अ‍ॅड .जयंत जायभावे यांनी मिळकतीचे काम करताना वकील वर्गाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

यावेळी दस्त नोंदणी क्षेत्रातील 35 वर्षाहून अधिक सेवा केलेल्या 11ज्येष्ठ वकिलांचा सन्मान अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. ए.व्ही.पठाण, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र उमाप व पुणे वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. बी. थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान अ‍ॅड राजेंद्र उमाप यांच्या वतीने देण्यात आलेल्या अ‍ॅंब्यूलन्सचे लोकार्पन त्यांचे वडील बाबुराव उमाप व शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. सुधाकर आव्हाड, अ‍ॅड. नरेश गुगळे, अ‍ॅड. सखाराम कोळसे पाटील यांनी तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत कानेटकर, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी तसेच तिसऱ्या सत्रात पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन करत आभार अ‍ॅड. लक्ष्मण येळे पाटील यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

21 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago