शिरूर तालुका

शिरूर शहरापासून कोंढणओढ्या पर्यंत शेकडो खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रीस्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहराच्या हद्दीपासून कोंढण ओढ्या पर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे. शेकडो खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रंचड हाल होत असून, काही ठिकाणी रस्ता फाटला आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी मात्र या सर्व परिस्थितीकडे डोळे झाक करून निद्रिस्त अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर सहाय्यक अभियंता, हे कार्यालयात भेटतच नसून ते कायम तालुक्याबाहेरच असतात.त्यामुळे त्यांचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना हे रस्ते दिसत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी अनेक वेळा या रस्त्यावरील खड्ड्यांविषयी लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट दिवसेंदिवस रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला असून, अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

त्यातच अनेक ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) न बसवल्याने दोन चाकी वाहनचालक आणि शालेय बसचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचा उद्रेक वाढत असून, “करोडो रुपयांचा निधी कुठे जातो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“दररोज या रस्त्यावरून तालुक्याच्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नागरीक आपल्या विविध कामांसाठी प्रवास करतात. पण रस्ता खड्ड्यांनी भरल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. जर तातडीने दुरुस्ती केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” अशी चेतावणी नागरिकांनी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शिरूर-कोंढण ओढा मार्ग ‘खड्ड्यांचा महामार्ग’ बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांची जोरदार मागणी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

12 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

15 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

17 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago