मुख्य बातम्या

टाकळी हाजी आरोग्य केंद्र प्रकरण; तिसऱ्यांदा दाखल झाली चौकशी समिती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासी गैरहजेरीमुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास झाल्याने परिसरातील ९ गावच्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती तिसऱ्यांदा टाकळी हाजी येथे दाखल झाली असून ग्रामस्थांनी या वेळी ठोस पुरावे व साक्षीदारांसमोर मांडणी केली.

गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी शिरूर शहरात राहतात, त्यामुळे गावातील रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी दरवेळी धावपळ करावी लागत होती. या अन्यायाविरोधात परिसरातील ९ गावांच्या ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदा आलेल्या चौकशी समितीने नागरिकांचे म्हणणे न घेता केवळ अधिकारी व त्यांच्या निकटवर्तीयांकडून जबाब घेत खोटा अहवाल तयार केला. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी यांनीच “वरिष्ठांच्या दबावामुळे खोटा अहवाल सादर करावा लागला” असे मान्य केल्याचे समोर आले. दुसऱ्या वेळेस पुन्हा तीच समिती दाखल झाल्याने ग्रामस्थांनी तिचा जोरदार विरोध करत तिला माघारी पाठवले.

अखेर तिसऱ्यांदा दि.३ रोजी चौकशी समिती टाकळी हाजी येथे दाखल झाली. यावेळी सरपंच अरुणाताई घोडे, नितीन पिंगळे व ग्रामस्थांनी ठोस पुरावे समितीसमोर सादर केले. वैद्यकीय अधिकारी केंद्रात राहत नसल्याचे वस्तुनिष्ठ दाखले तसेच गोळ्या–औषधांच्या नोंदीत झालेल्या मोठ्या गडबडी समितीच्या लक्षात आणून दिल्या. तेथील काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दबावामुळे सुरुवातीला चुकीचे जबाब दिले होते; परंतु समितीने स्पष्ट इशारा दिला की “चुकीचे जबाब दिल्यास तुमच्यावर थेट कारवाई होईल.” त्यानंतर त्यांचे नव्याने जबाब नोंदवण्यात आले.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आता समिती निपक्षपातीपणे अहवाल देणार का? की पुन्हा उच्चाधिकार्‍यांच्या दबावाखाली अधिकाऱ्याला वाचवले जाणार?” याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.जर वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली नाही आणि खोटा अहवाल तयार करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी व माधवी शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही, तर नागरिकांनी सोमवार दि. ६ पासून मोठ्या संख्येने उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

“आम्ही अनेकदा अर्ज, तक्रारी, मागण्या केल्या; पण प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांचे संगनमत उघड झाले. यावेळी जर पुन्हा न्याय न मिळाला, तर टाकळी हाजी व परिसरातील जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.आता प्रश्न असा की समिती खरी परिस्थिती दाखवणारा निष्पक्ष अहवाल सादर करेल का? की ‘बड्या कलेक्टरच्या दबावामुळे’ पुन्हा एकदा वैद्यकीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago