panchayat samit shirur
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यशवंत वाटमारे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी अपंग बांधवांच्या यशवंत घरकुल योजनेची वाट लावली असून पंचायत समितीमध्ये विविध प्रस्ताव अनेक महीन्यांपासून आर्थिक लालसेपोटी धुळ खात पडून असल्याचे प्रहार दिव्याग क्रांती संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय तरटे यांनी सांगितले.
दिव्यांग व इतर लाभार्थी वारंवार हेलपाटे मारत असून मुजोर आधिकारी यांनी गेल्या ७ ते ८ महीन्यापासून पुणे जिल्हा परिषदेकडे न पाठवता शिरुर पंचायत समितीमध्येच धुळ खात ठेवले आहे. यामुळे अपंग बांधव आक्रमक झाले असून ते पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे उपोषणाच्या तयारीत आहे..
शिरुर तालुक्यातील सर्व सामान्य लोक व शेतकरी यांची कामे पंचायत समिती मधील काही जबाबदार आधिकारी जाणीवपुर्वक प्रलंबीत ठेवत असून नाकरीकांची हेळसांड करत आहे, त्या नाकरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे,सरकारी योजना, तक्रारी अर्ज यांची दखल वेळत होत नसेल तर प्रशासनाने असे आधीकारी का पोसायचे,शिरुर पंचायत समिती हे ठिकाण चकरा मारण्याचा अड्डा झालाय असे मत शिवसेना शेतकरी तालुकाप्रमुख श्री योगेशभाऊ ओव्हाळ पाटील यांनी शिरुर तालुका डाॅट काॅम बोलताना सांगीतले.
सदर जबाबदार अधीकार्यांच्या विरोधात लवकरच मोठे आंदोलन करणार असल्याचे योगेश ओव्हाळ यांनी सांगितले. आता जिल्हा परीषदेचे सीईओ या कामचुकारांवर काय कारवाई करतात याकडे दिव्यांग बांधवाचे लक्ष लागले असून आमदार अशोक बापू पवार याबाबत काय भुमिका घेतात याकडे शिरुर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…