panchayat samit shirur

शिरुर तालुक्यात वाटमारेंनी लावली दिव्यांगाच्या योजनेची वाट

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यशवंत वाटमारे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी अपंग बांधवांच्या यशवंत घरकुल योजनेची वाट लावली असून पंचायत समितीमध्ये विविध प्रस्ताव अनेक महीन्यांपासून आर्थिक लालसेपोटी धुळ खात पडून असल्याचे प्रहार दिव्याग क्रांती संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय तरटे यांनी सांगितले.

दिव्यांग व इतर लाभार्थी वारंवार हेलपाटे मारत असून मुजोर आधिकारी यांनी गेल्या ७ ते ८ महीन्यापासून पुणे जिल्हा परिषदेकडे न पाठवता शिरुर पंचायत समितीमध्येच धुळ खात ठेवले आहे. यामुळे अपंग बांधव आक्रमक झाले असून ते पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे उपोषणाच्या तयारीत आहे..

शिरुर तालुक्यातील सर्व सामान्य लोक व शेतकरी यांची कामे पंचायत समिती मधील काही जबाबदार आधिकारी जाणीवपुर्वक प्रलंबीत ठेवत असून नाकरीकांची हेळसांड करत आहे, त्या नाकरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे,सरकारी योजना, तक्रारी अर्ज यांची दखल वेळत होत नसेल तर प्रशासनाने असे आधीकारी का पोसायचे,शिरुर पंचायत समिती हे ठिकाण चकरा मारण्याचा अड्डा झालाय असे मत शिवसेना शेतकरी तालुकाप्रमुख श्री योगेशभाऊ ओव्हाळ पाटील यांनी शिरुर तालुका डाॅट काॅम बोलताना सांगीतले.

सदर जबाबदार अधीकार्‍यांच्या विरोधात लवकरच मोठे आंदोलन करणार असल्याचे योगेश ओव्हाळ यांनी सांगितले. आता जिल्हा परीषदेचे सीईओ या कामचुकारांवर काय कारवाई करतात याकडे दिव्यांग बांधवाचे लक्ष लागले असून आमदार अशोक बापू पवार याबाबत काय भुमिका घेतात याकडे शिरुर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.