शिरूर तालुका

शिरुरमध्ये महिलांचे अनोखे रक्षाबंधन राखी सामाजिक प्रश्नांची अन ओवाळणी महिला सुरक्षेची…

शिरुर (अरुणकुमार मोटे) काल (दि १९) रक्षाबंधन हा सण सर्व ठिकाणी साजरा केला गेला. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण, यावेळी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणुन वेगवेगळ्या गोष्टी देत असतात. सध्या देशात आणि राज्यात महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत. महिलांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना महिलांनी महिला सुरक्षेची राखी बांधुन अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

 

या राखी मध्ये महिला सुरक्षा, महागाई निर्मूलन,महिला सबलीकरण,युवकांचे भविष्य,शेतीमालाला हमीभाव, शिक्षण, आरोग्य तसेच लाडक्या बहिणीला कोणते पैसे नको, पण सुरक्षा मात्र हवी आहे. याबाबत मजकुर लिहिलेला होता. त्यामुळे शिरुर येथील महिलांनी एक आगळी वेगळी राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. आमदार अशोक पवार यांनीही सर्व बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी राणी कर्डीले, गीता आढाव, साधना शितोळे, रोहिणी बनकर, संगीता शेवाळे, डॉ स्मिता बोरा, ज्योती लोखंडे, राणी शिंदे, शशिकला काळे, सविता बोरुडे, बेबी शितोळे, ज्योती हांडे, प्रियांका बंडगर, प्रियांका धोत्रे, छाया अल्हाट,सारिका विर्सेव, प्रतीक्षा पवार, कल्पना चांदगुडे, प्रीती बनसोडे, राजश्री शेजवळ, जया खांडरे, दुर्गा ननवरे, कल्पना पुंडे, मंगल गायकवाड, ललिता पोळ आदी महिला उपस्थित होत्या.

शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यासह एपीआय रमेश कदम यांनी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

शिरुर तालुक्यातील सविंदणे गावचे अरुणकुमार मोटे ;निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित

मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

7 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago