शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा येथील औट पोस्ट येते. १३ ऑगस्ट सकाळी ७:३० ते ८ च्या दरम्यान ध्वजारोहण केले. मात्र यावेळी तिथल्या परीसराची कोणतीही स्वच्छता न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण केले. त्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडुन एक प्रकारे तिरंग्याचा अवमान झाला असल्याने सदर पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुणे जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सचिव संतोष शिर्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशातील सर्व घरावर तिरंगा फडकवण्याचे आव्हान करण्यात आले होते. शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा पोलीस औट येत असल्याने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे तसेच मांडवगण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कदम यांनी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० ते ८ च्या दरम्यान हर घर तिरंगा याचाच एक भाग म्हणुन ध्वजारोहण केले. परंतु ज्या ठिकाणी ध्वज फडकवला. तो परीसरात अस्वच्छ होता त्यामुळे असे यांनी शिर्के यांनी लिहलेल्या पात्रात म्हटले आहे.
ज्या ठिकाणी पोलीस कर्मचान्यांनी तिरंगा फडकावला, तिथे गवत आणि गहाण असताना कुठलीही स्वच्छता केली नाही. त्यामुळे तिरंग्याचे पावित्र्य राखले नाही. गडबड करत तिरंगा फडकवून काम उरकले. त्यामुळे शिरुरचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे तसेच मांडवगणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कदम व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी मी पंतप्रधानाकडे केली आहे.
संतोष शिर्के
(सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे)
शिरुर तालुक्यातील सविंदणे गावचे अरुणकुमार मोटे निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित
मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु
शिरुर तालुक्यातील गुनाट येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणचा मान