शिरूर तालुका

टाकळी हाजी परिसरात अनधिकृतपणे मुरुम आणि वाळू ऊपसा सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी मंडल आधिकारी कार्यक्षेत्रात टाकळी हाजी सह डोंगरगण, शिनगरवाडी येथे राजरोसपणे अनाधिकृतरीत्या मुरूम उपसा, वाळू उपसा सुरु असुन तेथील तलाठी, मंडल अधिकारी आर्थिक तडजोडीमुळे मात्र मुग गिळून गप्प असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे. तसेच नागरीकांच्या वारस नोंदी, खरेदीखताच्या नोंदी, तहसिलदार यांच्या आदेशाच्या नोंदी तलाठ्यांनी टाकल्यानंतर प्रमाणित करण्यासाठी मंडल आधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नसल्याची तक्रार परीसरातील नागरीक करत आहे.

टाकळी हाजी परीसरात सध्या रस्त्यांची, तसेच नवीन बांधकामे सुरु आहे. त्यासाठी अनाधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता हजारो ब्रास वाळू उपसा ,मुरुम ऊपसा जोरदाररीत्या सुरु आहे. तातडीने बेकायदेशीररीत्या उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्यांचे पंचनामे करुन योग्य कारवाई करण्याची मागणी टाकळी हाजी परीसरातून होत आहे. डोंगरगण येथे (दि. २०) रोजी वाळू काढण्यासाठी एका वाळूमाफीयाला एका शेतकऱ्याने रस्ता न दिल्याने वाळूमाफीयाने त्या शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे. तो शेतकरी सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या माफीयांवर कारवाई करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असून तहसिलदार यांनी या प्रकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

4 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago