शिरूर तालुका

बाबुराव दौंडकर स्मारक समितीकडून दौंडकर कुटुंबीयांचा अपमान

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे पहिले आमदार तालुक्याचे सालकरी म्हणुन ओळखले जाणारे स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या रौप्य महोत्सव निमित्त शुक्रवार (दि १ जुलै) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले असताना बाबुराव दौंडकर यांचे कुटुंबीय तसेच करंजावणे ग्रामस्थ यांना कोणत्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. तरीही बाबुराव दौंडकर यांचे कुटुंबीय आणि करंजावणे ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

unique international school

यावेळी आमदार दौंडकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या स्वर्गीय पत्नी बबई दौंडकर यांची प्रतिमा त्यांचा मुलगा ॲड. प्रकाश दौंडकर यांनी स्मारक समिती मधील कार्यक्रमात बाबुराव दौंडकर यांच्या प्रतिमेशेजारी ठेवण्याचा प्रयत्न केला असता स्मारक समितीकडून त्यांची प्रतिमा बाजूला करण्यात आली. त्यामुळे आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीकडुन आम्हाला जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणुक देण्यात आली असा आरोप आमदार दौंडकर यांचे पुत्र ॲड्. प्रकाश दौंडकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना केला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील शिवसेनेची कारवाई मागे…

माजी आमदार दौंडकर यांचे पुत्र ॲड्. प्रकाश दौंडकर हे उच्चशिक्षित असून पोलीस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांचे स्मारक समितीच्या विविध कार्यक्रमांमध्ये कायमच योगदान असते. त्याचप्रमाणे करंजावणे गावातील बाबुराव दौंडकर यांच्या पुतळ्याची देखभाल तसेच त्या ठिकाणी रंगरंगोटी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्याचं काम ॲड्. दौंडकर यांनी केलेले आहे. त्यांचा विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतो. गेल्या वर्षी दोन वेळा करंजावणे ग्रामस्थ व स्वतः ॲड्. प्रकाश बाबुराव दौंडकर यांनी बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या पदाधिकारी आणि सचिव यांच्याकडे त्यांना समितीमध्ये सदस्य म्हणून तरी घ्या अशी वारंवार विनंती केली होती. तशा प्रकारचा रीतसर लेखी अर्ज दोन वेळा केला. परंतु त्या अर्जाबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी अथवा तोंडी उत्तर त्यांना देण्यात आले नाही.

आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समिती ही बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबीयांचा कुठल्याही प्रकारचा सन्मान न ठेवता त्यांचा वारंवार अपमान करत असते. त्यांना कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले जात नाही. तसेच आमंत्रण नसतानाही गेले असता त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जात नाही. कार्यक्रमात जाणूनबुजून त्यांच्या कुटुंबीयांचा नामोल्लेख करणं टाळलं जातं. तसेच दोन महिन्यांपूर्वी बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सदस्य म्हणून तरी आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्याला तरी स्थान मिळेल अशी अपेक्षा ॲड्. प्रकाश दौंडकर यांना होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे पद मागतोय म्हणून तुम्ही बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबीयांचा अपमान करता का…? असा प्रश्न बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबीयांना तसेच करंजावणे ग्रामस्थ विचारत आहेत.

आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीमध्ये सदस्य म्हणुन दौंडकर कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळावी असा अर्ज ॲड्. प्रकाश दौंडकर यांनी स्मारक समितीकडे केला होता. परंतु या अर्जाला समितीने कसलेच उत्तर दिले नसल्याने या अर्जावर जर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या प्रांगणात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बाबुराव दौंडकर यांचे पुत्र ॲड्. प्रकाश बाबुराव दौंडकर आणि करंजावणे ग्रामस्थ यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

16 तास ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

18 तास ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

3 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

3 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

3 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

4 दिवस ago