dead
शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथील येथून अक्षय शिरसठ हा युवक रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने आलेल्या पुणेच्या दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक अक्षय शिरसठ याला जोरदार धडक बसून अक्षय गंभीर जखमी झाला होता.
नागरिकांनी अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र, अक्षय पांडुरंग शिरसठ (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. फुलेनगर केज ता. केज जि. बीड) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
याबाबत विश्वनाथ पांडुरंग शिरसठ (वय ६९ वर्षे रा. फुलेनगर केज ता. केज जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहेत.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…