मुख्य बातम्या

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील शिवसेनेची कारवाई मागे…

मुंबई : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पण, काही वेळातच शिवाजीराव आढळराव पाटील यांची कारवाई मागे घेण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पाटील यांच्यावर त्याच्या समर्थकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे.

पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यावरही तशीच कारवाई करण्यात आल्याचे सामनातून वृत्तानुसार बोलले जात होते. दरम्यान, शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई शिवसेनेकडून मागे घेण्यात आली आहे.

unique international school

दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे शिर्षक दिले होते. पण, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. अमोल कोल्हे यांच्या विरोधीत लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते शिवसेनेत नाराज होते. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आता सावधतेने पाऊलं उचलताना दिसत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची…

2 दिवस ago

हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरु; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार

बारामती (प्रतिनिधी) किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा. तसेच…

2 दिवस ago

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल…

2 दिवस ago

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असुन माजी खासदार शिवाजीराव…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील 'हेलपाटा' कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी…

2 दिवस ago

घोलपवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे सामाजिक व धार्मिक एकोपा वाढेल; चंद्रकांत वांजळे

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील बांधण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे…

3 दिवस ago