शिरूर तालुका

करंदीत मोहरम सण मोठया उत्साहात साजरा

मुस्लीम बांधवांसह सर्व धर्मीयांची उत्सवात हजेरी

शिक्रापूर: मंगळवार (दि. ९) रोजी सर्वत्र मोहरम मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नेक ठिकाणी मुस्लीम समाजाचे ताबूत मिरवणूक निघत असताना करंदीत साजरा होणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून सर्वधर्मीय नागरिक व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते.

करंदी (ता. शिरुर) येथे गेली अनेक वर्षांपासून सर्व धर्मियांच्या सहभागाने मोहरम सण मोठ्या उत्साह व जल्लोषात साजरा होत असून आज देखील मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लीम धर्मियातील हसन व हुसेन यांच्या बलिदानाच्या पित्यर्थ मुस्लीम बांधव हा सण साजरा करण्यात येत असतो.

मंगळवार (दि. ९) रोजी आयोजित करण्यात आलेल्या ताबूत मिरवणूक प्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम इनामदार, ताजुद्दीन मनियार, कांताराम गावडे, राजू मनियार, सालेमहमंद इनामदार, जुनेद मनियार, शफिक इनामदार, आवेज मनियार, मुरलीधर नवगिरे, दशरथ नवगिरे, आरबाज आत्तार, सुखदेव नवगिरे, आण्णासाहेब गावडे, रवी कराळे, संकेत खेडकर, राजू लांडगे, विलास नप्ते यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम बांधव तसेच नागरिक सहभागी झाले होते, यावेळी मुस्लीम बांधवांच्या आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ताबूतची गावातीन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम इनामदार यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago