शिरूर तालुका

गुजर प्रशालेतर्फे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळेंना अभिवादन

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतर्फे क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकातून प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या बँड पथकामार्फत विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात काढून हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन करण्यात आले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना येथील क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतच्या वतीने मानवंदना देण्यात आली, याप्रसंगी माजी सैनिक आनंदराव ढमढेरे, सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

दरम्यान प्रशालेतील सायली मुळे व यश ससाने या विद्यार्थ्यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या बाबतची माहिती उपस्थितांना सांगितली, याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, तलाठी ज्ञानेश्वर बराटे, विजय ढमढेरे, माजी सैनिक संघटनेचे सुरेश उमाप, विठ्ठल जगताप, जालिंदर ढमढेरे, संतोष कांचन, सुदामराव भुजबळ, चंद्रकांत लांडगे, गुलाब गवारे, राजेंद्र धायरकर, विलास भुजबळ, पोपट नरके, पोपट होले, रमेश शेलार, सुनील चव्हाण, विलासराव शिवले यांसह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आढाव यांनी केले उपस्थित माजी सैनिकांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

2 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

3 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

3 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

3 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

6 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago