शिरूर तालुका

कुणाल कुरंदळेचे अभियांत्रिकी सह वैद्यकीय प्रवेश परीक्षेत दुहेरी यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापुर या ग्रामीण भागातील विद्यार्थी कुणाल ज्ञानदेव कुरंदळे यांनी यावर्षीच्या NTA ने घेतलेल्या नीट (वैद्यकीय अभ्यास क्रम प्रवेश) परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात720 पैकी 593 गुण मिळवूनAIR 1914 अशी उच्च दर्जाची रँकही प्राप्त केली आहे. त्या आधारे त्याला राष्ट्रीय स्तरावरीलभारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याने आपला प्रवेश निश्चित केला आहे. याच वेळी त्याने अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेली JEE mains परीक्षेतही 97.34 परसेंटाइल प्राप्त करत आणि JEE advance परीक्षेतही पात्रता मिळवून आयआयटी साठी प्रवेश पात्र ठरला आहे .महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेत (MHT -CET)देखील 99.29 परसेंटाइल त्याने प्राप्त केले आहेत. त्या आधारे देखील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळू शकतो .एकाच वेळी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेत त्याने दुहेरी यश प्राप्त केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाल्यानंतर पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर पुण्यातील महाराष्ट्र विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. तेथेही बारावी विज्ञान शाखेत 87% गुण त्याने प्राप्त केले आहेत.

कुणाल हा सुरुवातीपासूनच अत्यंत हुशारआणि जिद्दी मुलगा आहे. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मध्ये त्याने यश संपादन केले आहे. याशिवाय बुद्धिबळातही त्याने अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय खेळाडूचे मानांकन देखील प्राप्त केले आहे. कुणाल चे आई-वडील दोघेही पदवीधर शिक्षक असून वडील ज्ञानदेव कुरंदळे हे जिल्हा परिषदेच्या सणसवाडी शाळेत तर आई कल्पना कुरंदळे या हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.त्याच्या या दुहेरी यशाबद्दल कुणालचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे” असे गौरवोद्गार मनोबल फाउंडेशनचे संस्थापक थोर सामाजिक कार्यकर्ते यजुर्वेंद्र महाजन यांनी काढले. जीवन विद्या मिशन परिवाराचे निंबाळकर साहेब, शिक्षक नेते विकास भाऊ शेलार, अनिल पलांडे, बापूसाहेब लांडगे , अनिल महाजन अविनाश चव्हाण ,वक्ते पोपटराव इंगवले, शिरूर पंचक्रोशी आणि अण्णापुर ग्रामस्थ आदीनी त्याचे अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago