शिरूर पोलिसांनी कारवाई करत फाडले चलन
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उपअधीक्षक अमोल भोसले हे खासगी वाहनावर “महाराष्ट्र शासन” अशी शासकीय पाटी लावून फिरत असल्याचे उघड झाल्याने एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशनचे ट्राफिक हवालदार राजेंद्र वाघमोडे व शेखर झाडबुके यांनी तातडीने फोटो काढत चलन काढले आहे आहे. या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनात आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर वाहन खासगी असूनही त्यावर शासकीय वाहन असल्याचा आभास निर्माण करणारी पाटी लावण्यात आली आहे. यामुळे कायद्यानुसार तीव्र आक्षेप घेतला जात आहे. शासन नियमावलीनुसार केवळ शासनाच्या नावे नोंदणीकृत वाहनांवरच अशा स्वरूपाची पाटी लावण्यास परवानगी आहे. मात्र खासगी वाहनावर अशी पाटी लावल्यास तो फसवणूक, दिशाभूल आणि शासकीय अधिकाराचा गैरवापर मानला जातो.
या प्रकरणी जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे अधिकृत लेखी तक्रार सादर करणार असल्याचे सांगितले आहे.संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारकर्त्यांनी पुरावेही सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकारामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी निलेश वाळुंज या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
(क्रमश:)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…