आरोग्य

डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

आपण आपला चेहरा रोज आरशात न्याहाळतो. अनेकदा चेहऱ्यावर आपला काही बदल पाहायला मिळतात. बहुतेक लोक हे बदल समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे आरोग्याशी संबंधित प्रमुख लक्षण असू शकते. अनेकदा डोळ्यांखाली काळे वर्तुळे येणे, चेहरा काळा पडणे, ओठ फुटणे किंवा चेहऱ्यावर केस येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. आपण याकडे टॅनिंग किंवा हार्मोन्स बदल म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु, ही लक्षणे गंभीर झाल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर आपल्या चेहऱ्यावर काही बदल दिसू लागतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

अशक्तपणा-कमजोरी जाणवते, अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ आपल्या चेहऱ्यावरील काही बदल आरोग्याशी संबंधित गोष्टी सांगतात. ज्याकडे आपण लक्ष द्यायला हवे.

1) महिलांच्या चेहऱ्यावर नको असणारे केस 

ज्या महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस असतात त्याचे हार्मोनल असंतुलित असते. ज्यामुळे पीसीओएस किंवा पीसीओडी सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. तसेच थायरॉईड आणि अधिवृक्क ग्रंथीमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे चेहऱ्यावर केस दिसू लागतात.

2) आयब्रो पातळ होणे 

अनेकदा आपल्या आयब्रोवरील केस गळू लागतात किंवा भुवया पातळ होतात. असे जर वारंवार होत असेल तर आपण थॉयरॉईडची टेस्ट करायला हवी. हे हायपोथायरॉईडीझममुळे होऊ शकते. शरीरात आयोडिनची कमतरता असेल तर ही लक्षणे आपल्याला जाणवतात.

3) चेहरा लालसर होणे 

कोणत्याही कारणांशिवाय लालसर होणे किंवा रॅशेस येण्याच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. हे ऍलर्जी किंवा हिस्टामाइनमुळे होऊ शकते.

4) ओठ फुटणे 

ऋतुमानानुसार आपल्या ओठांवर परिणाम होतो. ओठ फुटणे किंवा कोरडे पडण्याची समस्या आपल्याला सतावते. हे शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी झाल्यास होते. याशिवाय बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे, पाणी न प्यायल्यामुळे देखील ओठांच्या तक्रारी वाढतात.

5) डोळ्यांखाली काळी वर्तुळे 

हार्मोनल असंतुलन, जास्त इस्ट्रोजन झाल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. तसेच शरीरात लोहाची कमतरता झाल्यास ही लक्षणे अधिक गंभीर होतात. तज्ज्ञ सांगतात या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच डॉक्टरांकडे जा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago