शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनमुक्तीचा संदेश

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आपले आरोग्य खूप महत्वाचे आहे. यासाठी ते जपले पाहिजे तुम्ही सर्व महिलांनी मिस्री,तंबाखू यासारखे व्यसन सोडले तर हा मकरसंक्रांतीचा दिवस सार्थक ठरला असे आम्हाला वाटेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले. रामलिंग येथील भिल्ल वस्ती येथे तेथील महिलांसोबत मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. यावेळी स्त्रियांनी संकुचित भावना, मासिक पाळी विषयी अंधश्रद्धा दुर व्हावी म्हणून त्यांना संस्थेच्या वतीने सॅनिटरी पॅड व जीवनावश्यक वस्तू वान म्हणून देण्यात आल्या.

 

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवत असते. वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलांना एक वेळ खाण्याची भ्रांत असते. तसेच त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे असे सण साजरे करण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या महिलांनी तिथे जाऊन त्यांच्यासोबत हा सण साजरा केला. यावेळी हळदीकुंकू लाऊन, तिळगूळ देत व्यसन सोडा असा संदेश देण्यात आला.

 

यावेळी साधना सखी मंचच्या अध्यक्षा साधना शितोळे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे, यशस्विनी वेलफेअर फाऊंडेशन नम्रता गवारे, राणी शिंदे, छाया हारदे, डॉ स्मिता कवाद, गीताराणी आढाव, जयश्री थेऊरकर, सोनल जोशी, तृप्ती जोशी,गायत्री देव्हाडे आदी महिला उपस्थित होत्या. या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

 

संक्रातीचा ओवसा वाया घालवु नका:- राणी कर्डीले 

मकरसंक्रात हा सर्व ठिकाणी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. मकरसंक्रात साजरा सण साजरा करावा पण महिला एकमेकांना ओवसताना,त्यात बोर, ऊस, हुरडा, गव्हाची ओंबी यासारख्या अनेक उपयोगी वस्तू त्यात असतात. या विनाकारण वाया जातात. यातून काहीच साध्य होत नाही मिळत नाही. त्यामुळे महिलांनी सण साजरे करत असताना आपले विचार बदलून जिथे गरज आहे.तिथे या वस्तू दान केल्या तर गरजवंतांची गरज भागेलं. आपल्याला ही त्यातून मानसिक समाधान मिळेल असे राणी कर्डीले म्हणाल्या.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago