शिरूर तालुका

खैरेनगर मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेनगर (ता. शिरुर) येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून मनोज पांडुरंग मोरे या युवकाचा जागीच मृत्यू होऊन अक्षय मोहन बोराडे हा गंभीर जखमी झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

खैरेनगर (ता. शिरुर) येथून अक्षय बोराडे व त्याचा मित्र मनोज मोरे हे दोघे २४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच २३ बि एफ ०१७७ या दुचाकीहून कान्हूर मेसाई हून पाबळ बाजूकडे चाललेले असताना कान्हूर मेसाई बाजूने आलेल्या अज्ञात कारची दोघांच्या दुचाकीला जोरदार धडक बसून दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने दोघा जखमींना उपचारासाठी पाठवून दिले या अपघातात मनोज पांडुरंग मोरे (वय २३) रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर हा मयत झाला तर अक्षय मोहन बोराडे (वय २२) रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर हा गंभीर जखमी झाला.

याबाबत सुहास विष्णू शेटे (वय २५) रा. चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. कसबापेठ ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago