शिरूर तालुका

शिक्षक दिलीप थोरात यांना पालकांच्या वतीने इलेक्ट्रिक दुचाकी भेट!

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील शाळेतील इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत २२ विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक दिलीप मारुती थोरात, मुख्याध्यापक रामदास आनंदराव थोरात तसेच सर्व शिक्षकवृंदांचा पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना, मार्गदर्शक शिक्षकांना, मुख्याध्यापकांना व शिक्षकांना अक्षय धुमाळ यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

शिक्षकांच्या परिश्रमाचा गौरव करण्यासाठी पालकांच्या वतीने दिलीप थोरात यांना इलेक्ट्रिक दुचाकी भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ट्रॉफी देण्यात आल्या. विशेष म्हणजे दिलीप थोरात यांनी स्वतःच्या वतीने सर्व २२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मनगट घड्याळ भेट दिले.

‘सायकल बँक’ उपक्रमातून विद्यार्थिनींना दिलासा…
जिल्हा परिषदेच्या ‘सायकल बँक’ उपक्रमाअंतर्गत दहा सायकली भेट देण्यात आल्या. या उपक्रमाची संकल्पना शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अण्णासाहेब भोसले यांनी मांडली होती. त्यामुळे दूरवरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची प्रवासाची सोय होणार असून शिक्षणात सातत्य राखण्यास मदत होणार आहे.

गावातील माजी सरपंच अश्विनी धुमाळ यांना नुकताच प्राप्त झालेल्या जिल्हा आदर्श सरपंच पुरस्काराबद्दल शाळा व्यवस्थापन समितीने विशेष सन्मानित केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली आमिर धुमाळ, प्रमुख पाहुणे सरपंच सारिका दत्तात्रय धुमाळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सन्मान, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग अनुभवायला मिळाला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव शाळेसाठी आणि गावासाठी संस्मरणीय ठरला. देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन पुणे जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपळे खालसा येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सन्मान, शिक्षकांचा गौरव आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या त्रिवेणी संगमामुळे हा उत्सव संस्मरणीय ठरला.

अध्यक्षपदाची सूचना लता नानेकर यांनी मांडली होती. अध्यक्षस्थान सौ. सीमा संतोष धुमाळ यांनी भूषविले. अनुमोदन सौ. रोहिणी धुमाळ यांनी केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक रामदास आनंदराव थोरात यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी उमाप व सुशीला माकर यांनी केले. आभार प्रदर्शन अण्णासाहेब गैद व प्रदीप धुमाळ यांनी केले.

पिंपळे खालसा शाळेची 1971 साला पासून ची शिष्यवृत्ती परंपरा कायम!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

10 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

10 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

10 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

10 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

10 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

10 तास ago