शिरूर तालुका

आपली माती क्रीडा प्रबोधिनीच्या शुभम थोरातला ७ लाखांची शिष्यवृत्ती…

​पुणे: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळेप्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग रणजीत देओल, महाराष्ट्र राज्य क्रीडायुक्त शितल तेली/ उगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमात आपली माती क्रीडा प्रबोधिनीचा राष्ट्रीय खोखो खेळाडू शुभम थोरात याला नॅशनल गेम्स स्पर्धेमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ७ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करून गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने हा सोहळा पार पडला.

शिरूर तालुक्यातील वाघाळे येथील शुभम थोरात याने ​अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर खो-खो खेळात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने आजवर खो-खोमधील राष्ट्रीय भरत पुरस्कार, रायझिंग स्टार ऑफ टूर्नामेंट अल्टिमेट खो खो पुरस्कार, राजे संभाजी पुरस्कार व महाराष्ट्र राज्याचे कर्णधार पद भूषवताना खो खो खेळातील महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत. त्याला त्याचे प्रशिक्षक धीरज दंडवते, रोहन सावंत, रमेश लोणारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यक्रमादरम्यान, शुभमने मिळालेल्या ७ लाख रुपयांपैकी २ लाख रुपये आपल्या आपली माती क्रीडा प्रबोधिनीच्या इतर खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी परत दिले.

​शुभम रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असून, त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉक्टर चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार गोविंद शर्मा, पुणे जिल्हा खो खो असोसिएशन सचिव शिरीन गोडबोले, रयत बँकेचे संचालक व क्रीडा मार्गदर्शक सुरेश तिटकारे यांनी देखील त्याचे अभिनंदन केले. या सन्मानामुळे शुभमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता.

​शुभमची ही कामगिरी इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. त्याने सिद्ध केले आहे की योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि जिद्द असल्यास कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते. वाघाळे व भोसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्याची कौतुक केले आहे.

वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago