शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये गोहत्येबाबत आवाज उठवीत स्वतःचा जीव धोक्यात घालत हजारो गोवंशाचे जीव वाचविणाऱ्या मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना शासनाकडून पुरवण्यात येणारे सशस्त्र पोलीस संरक्षण यापूर्वी पुणे जिल्हा मर्यादित असताना आता हे पोलीस संरक्षण पूर्ण महाराष्ट्र राज्यात देण्यात आले असल्याने गोराक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचे काम करणाऱ्या शिवशंकर स्वामी यांनी अनेक ठिकाणी गोवंशाची होणारी कत्तल उघडकीस आणून तसेच कत्तलीसाठी जाणाऱ्या हजारो गोवंशांची सुटका करत असंख्य कसायांवर गुन्हे दाखल केले. तसेच त्याबाबतची न्यायालयीन लढाई देखील शिवशंकर स्वामी स्वतः लढत आहेत. पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील स्वामी यांनी अनेक गोवंशाना कत्तलीपासून जीवदान दिले असून ग्रामीण भागात देखील गोरक्षक निर्माण केले आहे.
स्वामी यांच्या कार्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी अनेक जीवघेणे हल्ले झालेले असताना त्यांना शासनाकडून पुणे जिल्ह्यामध्ये निशुल्क पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले होते. मात्र स्वामी यांच्यावर पुणे जिल्ह्याचे बाहेरील जिल्ह्यात स्वामी यांच्यावर हल्ले करत हत्या करण्याचे कट रचले जात असल्याची गोपिनिय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्याने शासनाकडून शिवशंकर स्वामी यांना संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस संरक्षण देण्यात आलेले असून त्याबाबतचे पत्र देखील पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्या करुन स्वामी यांना देत संरक्षण देखील नेमण्यात आले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील गोराक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेले गोरक्षणाचे कार्य मोठ्या जोमाने करणार असून मिळालेले संरक्षण हे गोमातेचे आशीर्वाद असल्याचे शिवशंकर स्वामी यांनी सांगितले आहे.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…