शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेतर्फे सहेली वस्ती शाळेतील मुलांना दूध देऊन नागपंचमी साजरी

शिरुर (किरण पिंगळे) महिलांनी नागपंचमी हा सण साजरा करावा. परंतु दूध आणि लाह्या वारुळात ओतून देण्यापेक्षा जिथे जमेल तिथे गरजूंना दूध वाटप करावे. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणून सर्व माता-भगिनी यांनी आपले विचार बदला आणि समाजउपयोगी कार्य करत रहा असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. सोमवार (दि 21) रोजी नागपंचमी निमित्त गोरगरीब मुलांना दरवर्षी प्रमाणे दुधाचे वाटप करुन त्यांनी नागपंचमीचा सण साजरा केला.

 

सध्या देवाधर्माच्या नावावर अनेक ठिकाणी अंधश्रद्धेच्या नावाखाली अनावश्यक खर्च केला जातो. देवाच्या नावाखाली हजारो लिटर दुधाचा अभिषेक सुद्धा घातला जातो. मात्र मंदिराबाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना कुणी पोटाला नीट दोन वेळेचं अन्न देत नाही. त्यामुळे साधू संताच्या जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या राणी कर्डिले यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही समाजाभिमुख उपक्रम राबवत धर्म जपा, पण अंधभक्त न होता ,गरजूंना सहकार्य करत जा असा संदेश दिला.

 

ग्रामीण भागातील महिला नागपंचमी हा सण मोठया आनंदात साजरा करतात. या दिवशी महिला सुवासिनी वारुळाला जाऊन पूजा करतात. तर काही ठिकाणी वारुळात दूध ओततात तसेच लाह्या वाहतात. रामलिंग येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले या नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात. नागपंचमी सणानिमित्त रामलिंग येथील महिलांनी फेर धरले, फुगड्या खेळल्या, वारुळाला पण गेल्या. मात्र तिथे दुध किंवा लाह्या यापैकी काहीही अर्पण केले नाही. त्यामुळे काही प्रमाणात महिला बदल घडवत असल्याचे दिसत असल्याचे कर्डिले म्हणाल्या. यावेळी गायत्री डींगरे, आशा जाधव, आत्या जाधव,अनिता शिंदे, भोसले तसेच अनेक जेष्ठ महिला उपस्थित होत्या.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

1 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

4 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

4 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

5 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

5 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

5 तास ago