मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोत्यांनी गर्दी केली होती. पौराणिक, धार्मिक, सामाजिक आदी विषयावरती कलंगी तुरा म्हणणारे गायक व साथीदारांनी बहारदार कार्यक्रम सादर केला.
कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम लोणी येथे होत असतो. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कलंगीतुऱ्याचा महोत्सव भरतो. कार्यक्रमाला श्रोत्यांची बहुसंख्येने उपस्थित होती.
पौराणिक, धार्मिक, सामाजिक आदी विषयावरती कलंगी तुरा म्हणणारे गायक व साथीदार इथे बहारदार कार्यक्रम सादर करतात. कार्यक्रमाचे यंदाचे 29 वे वर्षे होते. कोरोनाचा दोन वर्षाचा कालखंड वगळता या कार्यक्रमाला खंड पडलेला नाही. सदर कार्यक्रमासाठी लोक उत्स्फूर्तपणे देणगी देतात. नागपंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमा मध्ये कलगीवाले शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा व तुरेवाले शाहीर रामदास गुंड यांनी आपल्या साथींदरासह कार्यक्रम सादर केला. हिंदू धर्माच्या पौराणिक कथा व नवीन विषयावर गीते त्यां ठिकाणी सादर करतात.
कार्यक्रमांमध्ये शाहीरांनी केलेल्या सवाल-जवाबाची माहिती सूत्रसंचालन करणारे उद्धवराव लंके हे श्रोत्यांना सविस्तर सांगतात. सदर कार्यक्रमाची सुरुवात लोणी गावातील लोकनाट्य क्षेत्रात कार्यरत असलेले कलावंत यांनी आपल्या नांदीने केली. सर्व कार्यक्रमाचे नियोजन कलंगी तुरा मंडळ व लोणी ग्रामस्थ करत असतात. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी सरपंच उद्धव लंके, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किसन गायकवाड, संतोष पडवळ, सतीश थोरात, बाळासाहेब आदक, सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश वाळुंज, पोलिस पाटील संदीप आढाव, हैबतराव आढाव, बाळासाहेब गायकवाड, माजी सरपंच सावळाराम नाईक, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक अदक पाटील, जगन लंके यांनी परिश्रम घेतले.
नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…
नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…
नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…