Mathadi
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बाहेरुन कंपनीचे साहीत्य घेऊन येणाऱ्या वाहनांच्या चालकांकडून माथाडीच्या नावाने “बोगस पावत्या” फाडुन जबरदस्तीने पैसे वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास कंपनीत येणाऱ्या गाड्या बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच औद्योगिक वसाहतीत असलेल्या “माथाडी” स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या असुन त्यांच्या नावावरच माथाडीची लोक चालकांकडुन जबरदस्तीने पैसे वसूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सुमारे ४०० च्या आसपास कंपन्या आहेत. या कंपन्यांत अनेकवेळा बाहेरुन कच्चा माल तसेच इतर साहित्य येत असते. त्यामध्ये छोटा हत्ती ते मोठ्या कंटेनर मधून हा माल कंपनीत आणला जातो. रांजणगाव MIDC मध्ये अनेक कंपन्यामध्ये “माथाडी” आहेत. त्यातल्या किती रजिस्टर आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अनेक माथाडीच्या लोकांना कंपनीच्या आत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ते लोक कंपनीच्या गेटवरच कंपनीत जाणारी वाहने अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने पावत्या फाडत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच कंपनीत गेल्यावर त्या चालकाला स्वतःची गाडी स्वतः किंवा क्रेनच्या साह्हयाने खाली करावी लागते हि वस्तुस्थिती आहे.
अशीच एक घटना नुकतीच रांजणगाव MIDC त उघडकीस आली असुन एका चालकाकडून माथाडी कामगार गेल्या २ वर्षांपासून माथाडीच्या नावाखाली पैसे उकळत होते. याबाबत माथाडीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हि माथाडी एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याची असल्याचे सांगितले. तसेच आमची माथाडी रजिस्टर असल्याचे सांगितले परंतु त्याबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्र मात्र दाखवण्यास नकार दिला. तसेच गाडीतले साहित्य खाली न करता तुम्हाला पैसे घेण्याचा अधिकार आहे का…? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
माथाडीच्या नावाने पैसे उकळणे अधिकृत कि अनधिकृत…?
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक बेकायदेशीर धंदे सुरु असुन माथाडीच्या नावाखाली पैसे उकळणे हा त्यातीलच एक प्रकार आहे. रांजणगाव MIDC मध्ये देशाच्या विविध राज्यातून मालवाहतूक करणारी तसेच काही स्थानिक वाहने येत असतात. या वाहनांच्या चालकांकडून काही जण “माथाडी” च्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळतात. पैसे देण्यास नकार दिला तर त्यांना प्रसंगी शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केली जाते. तसेच पोलिसांना तक्रार केली तर तुमची गाडी कंपनीत कशी येते तेच बघतो, अशी धमकी दिली जाते. त्यामुळे अनेक चालक हे बाहेरच्या राज्यातुन येत असल्याने “भीतीपोटी” ते पोलीस तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे या लोकांचं धाडस वाढत आहे.
“शिरुर तालुका डॉट कॉम” कडे याबाबत अनेक जणांनी तक्रारी केल्या असुन संबंधित माथाडी कर्मचाऱ्यांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी एका स्थानिक पुढाऱ्याची हि माथाडी असल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्याच आशिर्वादाने या सगळ्या गोष्टी चालतात हे सांगायला कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही. तसेच जर कोणाकडुन जबरदस्तीने अशा प्रकारे “माथाडी” च्या नावाने पैसे उकळले जात असतील तर त्यांनी पोलिसांना तक्रार करणे गरजेचे आहे. तरच अशा प्रकारांना आळा बसणार आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…