मुख्य बातम्या

तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात असलेली (हुंदाई आय 20) कार निमगाव फाट्याजवळ गलांडे फार्म हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना दुपारी 4 सुमारास घडली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की हि कार रस्त्यावर पासुन सुमारे शंभर फुट अंतरावर जाऊन उलटली. या अपघातात चारचाकी कारचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.

 

हा अपघात झाल्यानंतर बाजुलाच राहत असलेले संदीप भंडारे, योगीराज धुमाळ, सुखदेव ढोरे, पुरुषोत्तम घोलप, दीपक वडघुले, बाबासाहेब दौंडकर यांनी तातडीने ॲम्बुलन्सला कॉल करून उलटलेली कार सरळ केली व जखमी व्यक्तींना कारमधून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मदत केली.

 

तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर दररोज अपघाताचे सत्र सुरुच आहे. या 24 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकही गतिरोधक नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने अतिशय वेगाने चालतात. तसेच या रस्त्यावर वळणे अधिक असल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

13 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago