मुख्य बातम्या

हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरु; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार

बारामती (प्रतिनिधी) किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा. तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. सर्व वीज उपकेंद्रांना व शाखा कार्यालयांना सुरक्षा रक्षक नेमावेत व दिवंगत रिंकू बनसोडे यांचा खटना जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघटना संयुक्त कृती समिती’ने प्रशासनाला निवेदन दिले आहे. प्रशासनाने उपाययोजना करण्यास चालढकल केल्यास नाईलाजास्तव रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल असा इशाराही कृती समितीने दिला आहे.

 

मोरगाव (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अभिजीत पोटे नावाच्या नराधमाने वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे-थिटे यांची किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन कोयत्याने वार करत अत्यंत क्रूर व निर्दयीपणे हत्या केली. पोलीसांनी आरोपीला तातडीने अटक केली असली. तरी त्याला लवकरात लवकर व कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविणे गरजेचे आहे. तसेच या घटनेमुळे महाराष्ट्रातील सबंध वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावितरणच्या कामाचे स्वरुप पाहता वीज कर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होतात. मात्र रिंकू बनसोडे यांच्या हल्ल्याने या घटनेची तीव्रता लक्षात येते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने खालील उपाययोजना कराव्यात अशी संघटनेच्या संयुक्त कृती समितीची आग्रही मागणी आहे.

 

1) रिंकू बनसोडे यांचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शासन करावे. त्यासाठी प्रथितयश व खातन्याम वकिलांची नेमणूक करावी.

2) अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष आराखडा त्वरित तयार करावा.

3) कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करावेत.

4) सर्व वीज उपकेंद्रे व शाखा कार्यालयांमध्ये २४X७ सुरक्षारक्षक नेमावेत.

5) रिंकू बनसोडे यांच्या वारसांना मदत व देयके तातडीने अदा करावीत.

6) सर्व वीज कर्मचाऱ्यांना लोक सेवकाचा दर्जा मिळवून द्यावा.

7) वीजबिल वसुली व वीजचोरी रोखताना अनेकदा ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागते त्याकरिता बंद केलेली स्वतंत्र पोलीस ठाणे पुन्हा सुरु करावीत.

 

अशा आशयाचे निवेदन संयुक्त कृती समितीने महावितरणचे मुख्य अभिंयता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांना देण्यात आली आहेत. निवेदनावर संघटनेचे सुरेश देवकर, गणेश जाधव, कल्याण धुमाळ, चंद्रकांत दामोदरे, नितीन वाघ, श्रीधर कांबळे, रमेश चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

58 मिनिटे ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

3 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

3 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

3 तास ago

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…

3 तास ago

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…

3 तास ago