शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील मुखई आश्रम शाळेच्या विज्ञान उपकरणाची राज्यासाठी निवड….

शिक्रापूर (योगेश शेंडगे): पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सेंट जोसेफ बॉइस स्कूल खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २४ जानेवारी रोजी सेंट जोसेफ बॉईस स्कूल खडकी पुणे येथे झालेल्या ५२व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कै.रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ८ वी मधील कल्याणी कदम व साई कुरकुटे या विद्यार्थ्यांनी “पेट्रोल लेव्हल डिटेक्टर” हे उपकरणं स्वतःच्या कल्पनेतून व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून तयार केले व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इ ६ ते ८ च्या गटात सहभाग घेतला होता.

एक वेगळा नाविण्यपूर्ण व सद्यस्थितीत पेट्रोल पंपावर ग्राहकच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसावा, तसेच देशातील पेट्रोल फ्रॉड बंद व्हावा व देशाची खनिज संपतीची बचत व्हावी यासाठी हे उपकरण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे या प्रोजेक्टचे सर्वांनी कौतुक केले कारण हा विषय वास्तववादी व प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे .या उपकरणास पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे व अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड व गोडी लागावी म्हणून शाळेत विज्ञानविषयक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशिलता वाढीस लागते त्यातूनच असे नवप्रकल्प तयार होतांना दिसतात विज्ञान हा जिवनाचा अविभाज्य भाग आहे विज्ञानातून जगण्याची सिद्धता कळते त्यामुळे विज्ञानाची कास प्रत्येकांनी धरावी व त्यातुन नवनवीन प्रयोग केले जावेत. असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड अशोकराव पलांडे यांनी मांडले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक हनुमंत जाधव तसेच पाडुरंग गायकवाड व किरण मिसाळ यांचे संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे सचिव सुरेश रामराव पलांडे कार्याध्यक्ष ॲड.अशोकराव पलांडे सीईओ मंगेश मोरे तसेच प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

8 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

8 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

8 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

8 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

8 तास ago