महाराष्ट्र

मतदारांची माहिती लपवणे लोकशाहीसाठी घातक

झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा: नाना पटोले

मुंबई: लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्य़क्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे. काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे, नोकर भरती करण्याचे आश्वासन देऊन भाजपा युती सत्तेत आली आहे पण आता हे सरकार कर्जमाफी देण्यासाठी, नोकर भरतीसाठी निधी नाही असे सांगत आहे पण दुसऱ्याकडे सरकार बगलबच्च्यांवर सवलतींची खैरात करत साखर कारखाण्यांचे १०० कोटी रुपयांचे व्याज माफ करते हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. महागाई कमी करण्याऐवजी एसटी, रिक्षा व टॅक्शीची भाडेवाढ करून जनतेला महागाईच्या संकटात लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.

अरविंद केजरीवालांनी औकातीत रहावे..

‘आप’ने दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बदनामी करणारी पोस्टर्स लावल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे. बेईमान कोण? व भाजपाची बी टीम कोण? हे देशातील जनतेला माहिती आहे, असे खडे बोल नाना पटोले यांनी सुनावले. या कार्यक्रमाला CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, वरिष्ठ नेते हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, श्रीरंग बरगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

3 तास ago

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

12 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

12 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago