शिरूर तालुका

आरतीची परिस्थितीवर मात करत लेख परीक्षक पदाला गवसणी

शिक्रापूरच्या आरतीने मिळवले लेखा परीक्षक पद

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आरती केंडे- ब्राम्हणे हिने आई वडिलांची परिस्थिती हलाकीची असताना देखील परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन नगर विकास परिषदेतील लेखा परीक्षक पदाला गवसणी घातली असता नुकतीच रायगड जिल्ह्यातील म्हसाळा नगर परिषदेत लेखा परीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

शिक्रापूर ता. शिरुर येथे नोकरीच्या निमित्ताने जालना येथून शिक्रापूर येथे स्थायिक झालेले राधाकृष्ण केंडे यांना दोन मुले व एकुलती एक मुलगी आरती मात्र राधाकृष्ण केंडे यांनी होमगार्डची नोकरी करत परिस्थितीशी दोन हात करत मुलांना शिक्षण दिले, सन २०१३ मध्ये आरती बी. ए. च्या पहिल्या वर्षात असताना शिक्रापूर येथील महेश ब्राम्हणे यांच्याशी आरतीचा विवाह ठरत असताना केंडे कुटुंबाने आरतीच्या पुढील शिक्षणासाठी आग्रह ठेवला.

दरम्यान ब्राम्हणे कुटुंबाने देखील आरतीला आपली सून करुन घेत तिचे उच्चशिक्षण पूर्ण केले. मात्र आरतीने स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करत नगरविकास विभागातील लेखा परीक्षक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून केंडे व ब्राम्हणे या दोन्ही घराण्याचे नाव उज्वल केले, सध्या आरती रायगड जिल्ह्यातील म्हसाळा नगर परिषदेत लेखा परीक्षकपदी नियुक्त झाली आहे. गेली ४० वर्षांपासून शिक्रापूर ग्रामस्थांनी केंडे व ब्राम्हणे या दोन्ही कुटुंबाचे कष्ट पाहिलेले असताना आरतीच्या यशामुळे दोन्ही कुटुंबियांचे शिक्रापुरात कौतुक होत आहे.

आरतीचा दोन्ही कुटुंबांना अभिमान: महेश ब्राम्हणे
आरतीने लग्नापूर्वी आई वडिलांचे तसेच लग्नानंतर आमचे कुटुंब संभाळून शिक्रापूर येथील दररोज वाघोली व पुणे येथे प्रवास करुन यश मिळविले असताना सध्या उच्च पदावर कार्यरत झाली असल्याने आरतीचा आम्हा दोन्ही कुटुंबियांना अभिमान असल्याचे आरतीचे पती महेश ब्राम्हणे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

4 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

5 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

10 तास ago