शिरूर तालुका

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीसपदी डॉ. वर्षा शिवले

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले यांची नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी डॉ. वर्षा शिवले यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांनी यापूर्वी तालुकाध्यक्ष, शासकीय समिती सदस्य, अहमदनगर जिल्हा निरीक्षक, पुणे जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवित पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली आहेत, काही दिवसांपूर्वी त्यांनी नुकतेच शरद पवार यांच्यावर आधारित ॲग्री विथ कल्चर हे पुस्तक छापले आहे.

डॉ. शिवले यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर निवडीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत व बळकट करत येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाची मागणी करणार असल्याचे डॉ. वर्षा शिवले यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

17 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago