शिक्रापूर: बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथे संत तुकाराम सभामंडपाच्या उभारणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेकडून दहा लाख रुपयांचा खासदार निधी नुकताच उपलब्ध झाला असून सदर निधी मंजुरीचे पत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय टेमगिरे यांचेकडे सुपूर्द केले आहे.
बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथे संत तुकाराम सभागृह उभारण्याची मागणी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करत होते. याबाबत जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आलेली असताना खासदार कोल्हे यांनी देखील याबाबत तातडीने होकार देत स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत खासदार निधीतून दहा लाखांच्या निधीसाठी शिफारस केली असून त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. सदर मंजुरीचे पत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी सरपंच पुनम टेमगिरे यांचे पती दत्तात्रय टेमगिरे, उमेश दरवडे, संतोष भोगावडे यांचेकडे सुपूर्द केले.
बुरुंजवाडी गावामध्ये संत तुकाराम बीजेच्या वेळी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात असून पुढील येणाऱ्या सप्ताहच्या कार्यक्रम पर्यंत सदर सभागृह उभे राहिल असा आपला प्रयत्न असल्याचे देखील यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. तर या सभामंडपाचे बांधकाम पुणे सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग यांच्या माध्यमातून होणार असल्यामुळे होणारे काम दर्जेदार व्हावे अशी सुचनाही आपण स्वत: करणार असल्याचे सुद्धा डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी सांगितले.
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…