शिक्रापुर पोलिसांनी आठवडा बाजारात चोरट्यांचा डाव उधळला; दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापुर (ओमकार भोरडे) कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित सराईत चोरट्यांना शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा डाव उधळून लावला. बाजार परिसरात नियमित सुरु असलेल्या पायी पेट्रोलिंगमुळे ही कारवाई शक्य झाली. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमाच्या अन्वये शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होती. या गर्दीत पाकीटमारी, मोबाईल चोरी तसेच इतर चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार श्रवण गुपचे, नवनाथ नाईकडे आणि गणेश कुदळे हे बाजार परिसरात पायी पेट्रोलिंग करत होते.

याच दरम्यान बाजारातील गर्दीत दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. नागरिकांच्या हालचालींवर नजर ठेवत चोरीचा प्रयत्न सुरु असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी दोघांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यानंतर तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आपली नावे जावेद अजिज सय्यद आणि लुकमान सुलेमान सय्यद, दोघेही (रा. मदिरा मोहल्ला, शिरुर, ता. शिरूर, जि. पुणे) अशी सांगितली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक चौकशीत दोघांनी चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजित इंगवले करत आहेत.

यापुर्वीही गुन्ह्यांची नोंद…

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या दोन्ही आरोपींविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीसह विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोघांची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासण्यासह त्यांनी यापुर्वी आणखी कोणत्या ठिकाणी चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

आठवडा बाजारातील गर्दी ही चोरट्यांसाठी सोयीची ठरत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या पाकिटांवर, मोबाईलवर आणि दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असतो. मात्र शिक्रापुर पोलिसांनी संशयितांच्या हालचाली वेळेत ओळखून कारवाई केल्याने संभाव्य चोरीची घटना टळली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस हवालदार श्रवण गुपचे, नवनाथ नाईकडे, गणेश कुदळे आणि पोलीस हवालदार अजित इंगवले यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

आठवडा बाजारांवर पोलिसांची करडी नजर…

शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्रापुर, तळेगाव ढमढेरे आणि कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारांमध्ये गेल्या महिनाभरापासुन नियमित पायी पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे. बाजारातील गर्दीत चोरी, पाकीटमारी, मोबाईल चोरी आणि महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्यांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

यापुर्वी शिक्रापूर येथील आठवडा बाजारात चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन दोन महिलांना पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता कोरेगाव भीमा बाजारात आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या सलग कारवायांमुळे आठवडा बाजारात सक्रिय असलेल्या चोरट्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

“शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे आणि कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारांमध्ये नियमित पायी पेट्रोलिंग सुरू आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.”

चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक)

शिक्रापुर पोलीस ठाणे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

18 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago