शिरूर तालुका

शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला घेतले जालनातून चाशीसह ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील पंजाबी ढाब्यासमोरुन एक कंटेनरची नवीन चाशी चोरीला गेलेली असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने सखोल तपास करत आरोपीला चाशी सह जालनातून जेरबंद केले असून सुरेश देवराव जगदाळे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील पंजाबी ढाब्यासमोर कंटेनर चालक साहिल लाहुरी हा जे एच ०५ ए ७८५६ हा तात्पुरता नंबर असलेली नवीन 12 टायर असलेली चाशी घेऊन पनवेल येथे जात असताना त्याने चाशी ढाब्या समोर उभी केली असता अज्ञात व्यक्तीने चाशी चोरुन नेली होती. याबाबत सरबजित बलदेव सिंग (वय ४६) रा. टाटा नगर गोलमुरी ता. गोलमुरी जि. सिंबूम झारखंड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोलीस नाईक विकास पाटील, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, भरत कोळी, पोलीस शिपाई निखील रावडे, लखन शिरसकर हे करत असताना सदर चाशी जालना येथील सुरेश जगदाळे याने चोरुन नेल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक भरत कोळी यांनी जालना येथे जात सुरेश देवराव जगदाळे (वय ३४) लालवाडी ता. अंबड जि. जालना याला चोरीच्या चाशीसह ताब्यात घेत अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे
शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

14 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago