अधिकाऱ्याने स्वतः अंधारात राहुन सोडवला विजेचा प्रश्न
शिक्रापूर (शेरखान शेख): शासकीय कार्यालय व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे काम म्हणजे दिवसा दहा ते पाच असे म्हटले जातें, मात्र पोलीस चोवीस तास काम करत असताना आता विद्युत वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील रात्रंदिवस काम करत असल्याने शिक्रापूरचे ग्रामस्थ विजेच्या आशेवर मात्र विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचारी फिल्डवर असल्याचे दिसून आल्याने विद्युत वितरण विभागाचे कौतुक होत आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) सह अनेक ठिकाणी काल सायंकाळचे सुमारास वादळ आल्याने अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटून नागरिकांचा वीज प्रवाह सायंकाळच्या सुमारास खंडित झाला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करण्याची वेळ आलेली. त्यात विजेचे संकट असल्याने नागरिक हैराण झालेले असताना अनेकांनी आता उद्याच वीज येईल, अशी आशा ठेवलेली तर संपूर्ण गावात कोठेही वीज नसल्याने ग्रामस्थ वीज येण्याच्या आशेवर असताना विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन हे विद्युत विंतरणचे कर्मचारी दिगंबर सावंत, दत्ता ढाकरे, ज्ञानेश्वर पांडे, रामदास चव्हाण, प्रदीप धुळे, सचिन भालेराव, धनंजय गडवे, गोरक्ष वाडेकर यांना सोबत घेऊन कोरेगाव भीमा, सणसवाडी तसेच शिक्रापूर येथे विजेच्या खांबावर झालेला बिघाड दुरुस्त करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऐन अंधारात प्रयत्न करत होते.
अनेक ठिकाणी फक्त अंधाराचाच नव्हे तर ठिकठिकाणी कुत्र्यांपासून बचाव करत काट्याकुट्यातून रस्ता काढून विजेचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सदर अधिकारी व कर्मचारी झटत होते, त्यामुळे शिक्रापूरकर विजेच्या आशेवर असताना शासकीय घटक असलेले विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचारी फिल्डवर असल्याचे आणि रात्री दोनचे सुमारास त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले, तर याबाबत बोलताना नागरिकांना वीज नसल्याने मोठी अडचण होत असल्याने सदर वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.
महावितरणच्या लोकांचे कौतुक आहे; अशपाक मोमीन.
शिक्रापूर येथे वीजपुरवठा बंद झालेला असताना महावितरणचे लोक रात्री दोन वाजे पर्यंत अंधारात काम करत होते, त्यांच्यामुळे आम्हाला रात्री वीज मिळाली असल्याने महावितरणच्या कार्याचे खरेच कौतुक आहे अशी प्रतिक्रिया येथील हॉटेल वव्यावसायिक व ग्रामस्तः अशपाक मोमीन यांनी व्यक्त केली.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…