शिरूर तालुका

शिक्रापुरातील बहिण भाऊ एकाच वेळी पोलीस भरती

लक्ष्मण व राधाने मिळवली परिस्थितीशी झगडत खाकी

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पोलीस भरतीचे निकाल जाहीर झालेले असून शिरुर तालुक्यातील एक पती पत्नी एकाच वेळी पोलीस भरती झालेले असताना शिक्रापूर येथील एका बहिण भावाने देखील परिस्थितीशी दोन हात करत पोलीस भरती होत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आलेले नारायण सोळंके व गंगा सोळंके हे मुळचे जालना जिल्ह्यातील सावरगाव बुद्रुकचे त्यांची परिस्थिती हलाकीची त्यांना लक्ष्मण, विजय व राधा हि तीन मुले सुरुवातीपासून मुलांना शिक्षण देण्यासाठी दोघांनी खूप कष्ट केले. वडील नारायण हे चहाचा गाडा चालवून तर आई गंगा हि शेतात काम करुन कुटुंब चालवू लागले तर मुले मोठी झाल्यावर शिक्षणासह काही काम धंदा करु लागली.

लक्ष्मण दुचाकी दुरुस्तीचे तर विजय कंपनीत काम करु लागला मात्र दुचाकी दुरुस्तीचे काम करत असताना लक्ष्मण मन लावून अभ्यास करत असल्याचे पाहून अनेकांनी त्याची थट्टा केली परंतु काहीही झाले तर आपण पोलीस दलात जायचेच हे लक्ष्मणने ठरवले तर राधा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या भावाचेच पुस्तके वापरुन आपण देखील पोलीस व्हावे असे तिला वाटू लागले तिने अभ्यास सुरु केला तर लक्ष्मणने २०२१ पोलीस भरतीची परीक्षा दिली मात्र त्याला अपयश आले परंतु त्यांने जिद्द हरली नाही.

सध्या लक्ष्मण व त्याची लहान बहिण राधा दोघांनी देखील लोणीकंद येथील डिफेन्स करिअर अकादमीमध्ये पोलीस भरतीचा सराव केला आणि नुकतीच पार पडलेल्या परीक्षेत मन लावून अभ्यास करुन सामोरे गेले असताना सध्या जाहीर झालेल्या पोलीस भरती मध्ये लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके या दोघा बहिण भावांनी यश संपादित करुन आपल्या सह आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करत थट्टा उडवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे, तर आपली मुळे पोलीस भरती झाल्याचे ऐकून दोघांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तर याबाबत बोलताना आम्ही केलेल्या कष्टाचे मुलांनी चीज तर केले. मात्र मुलांचे यश पाहून आम्ही आमचे कष्ट सुद्धा विसरुन गेलो असल्याचे लक्ष्मण व राधा यांचे वडील नारायण व आई गंगा यांनी सांगत आपल्या मुलांच्या यशा बद्दल मुलांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

पुढील जिद्द देखील कायम ठेवणार आहे…

आमच्या आई वडिलांच्या कष्टाची आम्हाला जाणीव तसेच काहींनी केलेली चेष्टा यामुळे आम्ही शालेय शिक्षणाबरोबर पोलीस भरतीमध्ये जिद्दीने यश संपादित केले असून यापुढील काळात देखील आम्ही पुढील परीक्षांना सामोरे जाणार असल्याचे लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago