शिरूर तालुका

आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलला १ लाखांची ग्रंथसंपदा भेट…

शिरूर (अरूणकुमार मोटे): आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलच्या ग्रंथालयाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत १ लाख रुपयांची ग्रंथसंपदा आणि ५ हजार रुपयांच्या वह्या भेट दिल्या. यात मराठी भाषेतील दूर्मिळ ग्रंथ, महान व्यक्तींचे चरित्र, कथा, कादंबऱ्या आणि कविता संग्रहांचा समावेश आहे. या सर्व ग्रंथसंपदेमुळे ग्रंथालयाच्या ग्रंथवैभवात निश्चितच भर पडली असून विविध क्षेत्रातील वाचक, विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांसाठी बौद्धिक मेजवानीच ठरणार आहे.

महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे येथे मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंबळे गावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे, ग्रामविकास समिती अध्यक्ष विलास दादा बेंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भाऊसाहेब बेंद्रे, माजी मुख्याध्यापक यशवंत बेंद्रे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामराव बेंद्रे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा पाटील बेंद्रे, माजी अध्यक्ष शालेय समिती राजेंद्र एकनाथ बेंद्रे, ग्राहक पंचायत अध्यक्ष दिलीप सर्जेराव बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते गणेश संजय बेंद्रे, शिरूर केसरी पैलवान जयदीप बेंद्रे, सोसायटी संचालक नवनाथ बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते किसनराव बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते देविदास खेडेकर, युवा नेते श्रीकांत बेंद्रे, आरोग्य विभागाचे आघाव मॅडम उपस्थित होते.

मुख्याध्यापक संजयकुमार जोरी, सर्वं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम प्रसंगी अण्णा पाटील बेंद्रे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष) यांनी एक लाख रुपयाची देणगी देण्याचे जाहीर केले आहे. १ लाख रुपयांची पुस्तके गणेश बेंद्रे यांजकडून तसेच ५ हजार रुपयांची भेट वस्तू व वह्या सरपंच सोमनाथ बेंद्रे यांजकडून सप्रेम भेट देण्यात आले. सर्व दानशूर व्यक्तींचे विद्यालयाच्या वतीने आभार मानन्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे महिबबु सय्यद यांचे आमरण उपोषण सुरु…

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच; पाहा वैशिष्ट्ये…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago