शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर दशरथ तांबे (वय ६९, रा. गणेगाव खालसा) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी (ता. १३) निधन झाले. गुरुवारी सकाळी शेतातील कामे आटोपून घरामध्ये आराम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
श्रीधर तांबे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. आयपीएस अधिकारी असलेले ‘पीएमआरडीए’चे पोलिस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल तांबे यांचे ते वडील होत, तर पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अर्चना अमोल तांबे यांचे ते सासरे होत.
श्रीधर तांबे यांनी खेड, जुन्नर, आंबेगाव, दौंड, शिरूर या तालुक्यात त्यांनी तलाठी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर सर्कल इन्स्पेक्टर, सर्कल ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते. 2014 साली भोर तालुक्यात असताना ते नायब तहसीलदार पदावरून निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनंतर गणेगाव खालसा येथील आपल्या गावामध्ये शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करत, आधुनिक पद्धतीने शेती करून एक प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. कोरोना काळात गावात कोविड सेंटर उभारण्यापासून, शाळांना मदत करत सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
गणेगाव खालसा येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महसूल तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह, शिरूर तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शनिवारी (ता. २२) गणेगाव खालसा येथे सकाळी दशक्रिया विधी होणार आहे.
रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन
सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…
शिंदोडी येथील उद्योजक शिवलिंग वांगणे यांचे निधन
रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक
माजी आमदार सुभाष चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता हरपला