आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पलांडे कुटुंबियांचा अनोख उपक्रम

शिरूर तालुका

मुखईत पलांडे कुटुंबियांतील सदस्यांकडून आई वडिलांची सन्मान करत ग्रंथतुला

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील बबन पलांडे व रत्नाबाई पलांडे या दाम्पत्याने मोठ्या कष्टाने संसार उभा करत आपल्या मुलांना शिक्षण दिले. शिक्षणानंतर पलांडे दाम्पत्यांची मुले सध्या शिक्षक, आयकर आधिकारी, IPS व IAS अधिकारी अशा उच्च पदावर काम करत आहेत. ग्रामीण भागात अद्यापही एकत्र कुटुंब पद्धत असून आई वडिलांबाबत अद्यापही आदर पाहावयास मिळत असताना सदर पलांडे कुटुंबाने आपल्या बबनराव वामनराव पलांडे व रत्‍नाबाई बबनराव पलांडे या आई वडिलांचा गुरु पौर्णिमेच्या दिवशी आलेला वाढदिवस मोठ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेत आयकर अधिकारी नंदकुमार पलांडे व कुटुंबीयांनी आपल्या नातेवाईकांना आमंत्रित केले.

unique international school
unique international school

याप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीपदादा वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, सुभाष उमाप, IPS अधिकारी नचिकेत शेळके, IAS अधिकारी निधी शेळके, उपसभापती सविता पऱ्हाड, जिवन पलांडे, दिलीप लोखंडे, माऊली खैरे, नवनाथ कदम, संभाजी खैरे, विश्वास पऱ्हाड, कानिफनाथ साकोरे, राम थिटे, संदीप पवार, धनराज पिंगळे, प्रशांत पलांडे, कैलास मासळकर, शिवाजी मासळकर, संदिप वारे, दादासाहेब सुक्रे यांसह आदी नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

आयोजित कार्यक्रमात कुटुंबियांच्या वतीने आपल्या आई वडिलांची ग्रंथतुला करण्यात आली, तर यावेळी वृद्धपकाळाच्या वयात आनंदाच्या वातावरणात सर्व नातेवाईक आपणास भेटायाला येऊन आपल्याला सन्मानित केल्याचे पाहून या दोन्ही माता व पित्याला आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्याते गणेश शिंदे यांनी आधुनिक काळात नाती कशी दूर चालली आहे याविषयी आपले मत मांडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माउली पलांडे यांनी केले, तर प्रास्ताविक सचिन पलांडे व संकेत शेळके यांनी केले व सागर पलांडे यांनी आभार मानले.