shirur-rain
शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यात गेल्या सोळा तासांपासून मुसळधार पावसाचा कहर कायम असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. रविवारी (ता. १४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर बाजरी, मका, पाले भाज्या, फळबागा, नवीन ऊस लागवड या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
कांद्याची खर्चिक लागवड उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी वर्गात हतबलता पसरली आहे. अनेक शेतात पाणी ओसंडून गेल्याने उभे पीक आडवे झाले असून, नाले व ओढ्यांना पूर आल्याने पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाने सिंचन केलेली पिके एका रात्रीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी केली आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास नुकसानाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शिरूर तालुक्यातील शेती पाण्याखाली गेल्याचे विदारक चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात असहाय्यतेची भावना दाटून आली आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी तालुकाभरातून होत आहे.
सविंदणे- लोणी रस्ता गेला खड्ड्यात, रस्त्याची दुरावस्था झाल्याने होतायेत अपघात
शिरूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च
Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अज्ञातांनी टाकले गतिरोधक; वाहनचालक संतप्त
रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल
भरधाव टँकरची दुचाकीला धडक दिल्याने हलाखीच्या जीवनाशी झुंज देणाऱ्या महिलेवर काळाचा घाला
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…