शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्पूर्वीचे उपसरपंच कांताराम नऱ्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपद रिक्त झाले होते.

यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतून एकमेव प्रदिप साळवे यांचे नामनिर्देशन अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच लीला पवार यांनी काम पहिले. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेतून प्रदिप साळवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी घोषित केले. यावेळी उपस्थितांच्या वतीने साळवे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रसंगी माजी सरपंच सविता माशेरे, स्नेहल थोरात, अनिता घुले, सोनाली थोरात, राजेंद्र शिंदे, सखाराम बर्डे, माजी सरपंच बबन थोरात, योगेश थोरात, प्रकाश थोरात, गंगाधर माशेरे, पोपट घुले, सोसायटीचे अध्यक्ष अशोक माशेरे, सखाराम थोरात, पोलीस पाटील दिलीप साळवे, अविनाश सोनार, भाऊसो जाधव, केशव पवार, वैभव माशेरे, लक्ष्मण पवार, साईनाथ घुले, प्रवीण थोरात, सोमनाथ बोरगे, अजित साळवे, चांगदेव माशेरे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
