शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे गेल्या सात-आठ वर्षांपासून सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले कसे ? इराद्या पत्रावरच बोगस पद्धतीने शाळा तब्बल ७ ते ८ वर्ष सुरु ठेवली गेली. यात तेथे इयत्ता १ते ६पर्यत शिक्षण घेणाऱ्या ३०५ विदयार्थांचे भविष्यात अतोनात नुकसान होणार आहे. पालकांना अंधारात ठेवल्याचा प्रकार घडला असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत पंचायत समिती शिरूर, शिक्षण विभागाने या शाळेला लेखी पत्र काढले असून त्यात असे म्हटले आहे की, तुम्ही शासन परवानगी अथवा शासन मान्यता प्रमाणपत्राशिवाय अनधिकृतरित्या शाळा चालवीत आहात. त्यामुळे तुमची शाळा अनाधिकृत घोषित करण्यात येत आहे. सन २०२४ – २५ मध्ये तुमच्या शाळेत इयत्ता १ली ते ६ वी पर्यंत वर्ग सुरु असून पट संख्या ३०५ इतकी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आर टी ई अॅक्ट २००९) ची अंमलबजावणी १ एप्रिल २०१० पासून सुरू झालेली आहे. सदर कायद्यातील कलम १८ नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येणार नाही. कलम १८ (५) अनुसार जर राज्य शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र शिवाय शाळा चालवण्यात येत असेल अथवा शाळेची मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालवण्यात येत असेल तर संबंधितांना रुपये १ लाखापर्यंत दंडाची रक्कम व त्यानंतरही शाळा अनधिकृत चालू राहिल्यास रुपये १० हजार प्रती दिवशी दंड करण्याची तरतूद अधिनियमात करण्यात आलेली आहे.
अनाधिकृत शाळा सुरू राहिल्याने तेथील कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची फसवणूक केली जाते. शासन परवानगी किंवा मान्यता प्रमाणपत्र शिवाय अनधिकृत रित्या सुरू असणाऱ्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यामधील संबंधित व्यक्ती यांचे विरुद्ध संदर्भ क्रमांक अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पुणे यांनी फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
दरम्यान, आता या शाळेवर काय कारवाई केली जातेय ? की बडया राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होतोय हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.
शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी
शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी
शिक्षकांच्या बदलीसाठी चक्क शाळा भरवली शिरूर पंचायत समितीत…
शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…
शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…