ashok-bhorde
शिक्रापूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील RTI /व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार क्रं एम एच १२ एक्स ई ५१०९ शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी RTI / व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे हे कुटुंबियांसोबत कोल्हापुर येथे जात असताना हि घटना घडली आहे. अशोक भोरडे यांनी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे नियमबाह्य डोंगर उत्खनन चालू असल्याबाबत शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच तलाठी आबासाहेब रुके यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे दुःखावलेल्या काही जणांना चीड आल्याने भोरडे यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांची हत्या करण्याचा कट रचला. परंतु, अशोक भोरडे यांनी शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले तसेच बीट अंमलदार किशोर तेलंग यांना फोन केला. शिवाय ११२ वर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यामुळे तातडीने पोलिस हवालदार किशोर तेलंग व अमोल नलगे हे घटनास्थळी आले आणि पाठलाग करणारी कार त्यांनी ताब्यात घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत भोरडे यांच्या फिर्यादीवरुन अमोल सतिश वडघुले, मयुर शामराव वडघुले, राहुल शंकर करपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भोरडे यांच्या जिवीताला धोका…?
या घटनेमुळे RTI / व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोरडे यांनी यापुर्वीही अनेकवेळा गौणखनिज उत्खनन, वाहतुक आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या असून त्यांची चौकश्या चालू आहेत. तसेच त्यांनी वेळोवेळी उपोषण, आंदोलन करुन अनेक पिडीत व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत संघर्ष करत आहेत. त्यामुळे अनेकजण त्यांच्यावर चिडून आहेत. त्यामुळे त्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. शासनाने त्यांच्या जिवीताची काळजी घ्यावी, अशी मागणी तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनेने केली आहे.
मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु…
शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?
सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या आंदोलनामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नरमाईची भुमिका
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…