RANJANGAON

शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जण गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…

क्राईम शिरूर तालुका

दबंग उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या कामगिरीकडे तालुक्याचे लक्ष..

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील संस्था अध्यक्षासह अन्य पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केल्याने त्याचा वारंवार मानसिक छळ, आर्थिक लाभापासून वंचित ठेवून, दबाव दमदाटी करून कोऱ्या दस्तऐवजावर बळजबरीने सह्या घेऊन सर्वासमक्ष जातीय शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह संस्था सचिव प्रकाश बोरा, शाळा समिती सदस्य अनिल बोरा, परिवेक्षक कुमारपाल बोरा, वरीष्ठ लिपिक सुभाष पाचकर, सुरज जाधव यांच्यावर अँट्रॉसिटी अंतर्गत रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळे आरोपी गुन्हे दाखल झाल्यापासून फरार झाले आहे.

या शिक्षण संस्थेमध्ये अनेक बोगस बिले तयार करून घोटाळे, वसुलीचे फंडे सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. या विषयी एका युवकाने वरीष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. संस्थेतील बड्या व्यक्तींचे राजकीय व्यक्तींसोबत घनिष्ठ संबंध असल्याने कारवाई टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असल्याची विश्वसनीय माहिती समजली असून नागरिकांमध्ये ही चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यामुळे या बड्या संस्था पदाधिका-यांवर काय कारवाई होणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नवनियुक्त दबंग पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असल्याने नागरिकांमधून कौतुक केले जात आहे. मात्र, आता राजकीय हस्तक्षेपामुळे शिरूर शहरातील बड्या शिक्षण संस्था अध्यक्षांसह अन्य पाच जणांवर कठोर कारवाई होणार का ? त्यांना कर्तव्यनिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले अटक केव्हा करणार? की संस्थेतील बड्या व्यक्तींचे राजकीय व्यक्तींसोबत घनिष्ठ संबंध असल्याने त्यांना अभय मिळणार? याची चर्चा शिरुर शहरासह तालुक्याच्या गल्लोगल्ली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वरीष्ठ पोलिस अधिकारी राजकीय दबावाला न जुमानता त्यांना गजाआड करणार का ? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल

सावधान; पालकांनो शिरुर मधील इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेताय…तर हि बातमी नक्की वाचा