apeksha-thorat-waghale

ऍड. अपेक्षा अशोक थोरात यांचे अपघाती निधन

शिरूर तालुका

शिरूर : वाघाळे येथील ऍड. अपेक्षा अशोक थोरात (वय २६) यांचे शुक्रवारी (ता. २५) दापोडी येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडिल, भाऊ, बहिण, चुलते असा परिवार आहे. वाघाळे येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऐन तारुण्यात अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऍड. अपेक्षा अशोक थोरात यांचे वडिल सुभेदार अशोक थोरात हे लष्करात असल्यामुळे त्यांचे शिक्षण देशातील विविध शहरांमध्ये झाले. ऍड. अपेक्षा या अभ्यासात पहिल्यापासून हुषार होत्या. अयोध्या येथे १२वीच्या वर्गात प्रथम आली होती. वडिलांच्या सेवानिवृतीनंतर खांदवेनगर (पुणे) येथे स्थायिक झाले होते. सिंहगड कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ही पदवी मिळवली होती. यानंतर त्यांनी न्यायाधिष पदाची परिक्षा दिली होती.

ऍड. अपेक्षा या शुक्रवारी कामानिमत्त दुचाकीवरून पिंपरी-चिंचवडच्या कोर्टाकडे जात होत्या. दुचाकी चालवत असताना हेल्मेट घातले होते. दापोडीजवळ ट्रकच्या धडकेनंतर खाली पडल्यानंतर त्यांच्या शरिरावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन निघाले होते. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले. वाघाळे (ता. शिरूर) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाघाळे येथे रविवारी (ता. ३) दशक्रिया विधी होणार आहे.

शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी

दिंडोरी रस्त्यावर भीषण अपघात, अल्टो कारमधील 7 जणांचा जागीच मृत्य

MPSC ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…