rajendra-dhaybar

वाघाळे येथील राजेंद्र विठ्ठल धायबर यांचे निधन

शिरूर तालुका

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील राजेंद्र विठ्ठल धायबर (वय ५२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे. अंगणवाडी शिक्षिका नंदा धायबर या त्यांच्या पत्नी होत.

राजेंद्र विठ्ठल धायबर यांची परिसरात तात्या म्हणून ओळख होती. शिवाय, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांसोबत मैत्रिचे नाते होते. मंगळवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास त्यांचे अल्पशा आजाराने शिक्रापूर येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवार बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाघाळे गावातील ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, वाघाळे येथे गुरुवारी (ता. १४) सकाळी आठ वाजता दशक्रिया विधी होणार आहे.

वाघाळे येथील शामराव एकनाथ शेळके यांचे निधन

वाघाळे येथील मच्छिंद्र थोरात यांचे निधन

वाघाळे येथील जनाबाई पवार यांचे निधन…