शिरूर तालुका

राज्यातील कारागृहावर राहणार आता ड्रोनची नजर

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार असून त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय सुनील ढमाळ, येरवडा कारागृह अधीक्षक राणी भोसले, प्राचार्य दौलतराव जाधव, तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा चंद्रमणी इंदुरकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कारागृह सुरक्षा बळकटीकरण करण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले असून त्यानुसार 12 ड्रोन विविध कारागृहातील बारीक गोष्टींवर हालचाली टिपणार आहे. संबंधित ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळीही चित्रीकरण करण्यात येणार असून विशेषतः कारागृहात होणाऱ्या घटना आणि कैद्यांची अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण व चंद्रपूर याठिकाणी ड्रोन पाहणी सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन टेहळणीसाठी प्राधान्य दिले आहे. उत्तर प्रदेश राज्याने देशात प्रथम कारागृह सुरक्षा बळकटीकणासाठी ड्रोनचा वापर सुरू केला. महाराष्ट्र राज्य कारागृह सुरक्षा बळकटीकणासाठी ड्रोन वापरणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले आहे.

राज्यातील कारागृहासह बंदिवानांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर आता ड्रोन द्वारेही हालचाली टिपण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर 8 मध्यवर्ती, 2 जिल्हा कारागृहावर व 2 खुले कारागृहावर ड्रोनची नजर ठेवली जाणार असल्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हजारो कोटींचा खर्च, तरीही कचऱ्याचा विळखा; मुंबईला आता परिणामकारक प्रशासनाची गरज

मुंबई : मुंबईच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी…

15 मिनिटे ago

‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! काँग्रेसवरच भडकल्या अंजली दमानिया; सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ भूमिका

काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; "अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही" मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान…

21 मिनिटे ago

प्राजक्ता माळीच्या तुळजाभवानी मंदिरातील फोटोंवरून वाद; ‘सामान्यांसाठी एक नियम, सेलिब्रिटींसाठी दुसरा?’

गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने…

26 मिनिटे ago

बाळूमामा देवस्थानात 60.75 कोटींचा घोटाळा; गुन्हे दाखल, तरी आरोपी फरार!

आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख…

2 तास ago

पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’

‘राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण मुंबई :…

2 तास ago

ब्लड कॅन्सरचे प्रकार व त्यावरील उपचार

रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो…

3 तास ago